- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी कृषी पंप वाटपाची योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज महावितरणकडे पडून आहेत. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार असून त्यात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी पंपाची प्रतीक्षा असलेल्या शेतकºयांच्या आशा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे पल्लवीत झाल्या आहेत. मुबलक पाणी असूनही अनेक शेतकरी केवळ कृषी पंप नसल्यामुळे शेतीला पाणी देऊ शकत नाहीत. त्यात विद्युत भारनियम असेल तर पुन्हा अडचणी. दिवसभर विद्युत गुल राहत असल्याने रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा होतो. अशावेळेस अनेक शेतकरी रात्रीला शेतात जाऊन पिकांना पाणी देतात. त्यावर शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, त्यामाध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. ८ डिसेंबर २०१७ पासून कृषी पंप वापटपाची योजना बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना महावितरणकडून मिळणाºया कृषी पंपाचा लाभ घेता आला नाही. दरम्यानच्या काळात महावितरणकडे जिल्ह्यातील १५४ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. परंतू योजनाच बंद पडल्याने शेतकºयांना कृषी पंपाच्या प्रतीक्षेतच रहावे लागले. परंतू आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय १६ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडाळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षात राज्यात एक लाख पंप बसविण्यात येणार असून त्यातील २५ हजार पंप यंदाच्या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहेत. कृषी पंप वितरणात पेंडिंगमधील शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांनी भरलेली अनामत रक्कम शेतकºयांच्या हिश्शात समायोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महावितरण कार्यालयाकडे कृषी पंपासाठी आलेल्या १५४ शेतकºयांच्या अर्जावर विचार होणार असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिक्षक अभियंता कडाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे अर्ज धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:23 PM