बुलडाणा : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बुलडाण्याच्या कलाकारांचे नाटक रसिकप्रिय ठरले. ह्यसब भुमी गोपाल कीह्ण, या नाटकास ५४ व्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अमरावती विभागातून, कलारसिक शिक्षण व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था बुलडाणा यांना उत्कृष्ट निर्मितीचा द्वितीय, विजय सोनोने व गणेश देशमुख यांना दिग्दर्शनाचा द्वितीय, आशा अंजनकर यांना नेपथ्यामध्ये प्र थम, मनोज नांद्रेकर यांना प्रकाश योजनेसाठी द्वितीय, विशाल बट्टकर यांना रंगभुषेसाठी द्वितीय याप्रमाणे बक्षिसे मिळाली आहेत.प्रख्यात लेखक रवींद्र इंगळे चावरेकर लिखीत व विजय सोनोने व गणेश देशमुख दिग्दश्रीत सब भुमी गोपाल की, हे नाटक अतिशय प्रभावी मांडण्यात आले आहे. दज्रेदार नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना, प्रसंगानुरुप संगीत, प्रभावी संवाद, पात्रांना साजेशी वेशभुषा, अभ्यासपूर्ण दिग्दर्शन या नाटकाच्या जमेच्या बाजू ठरल्यात. नाटकामध्ये छोटा गोपालच्या भूमिकेमध्ये अथर्व जाधव खूप भाव खावुन गेला, त्यांनी सर्व प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली. या नाटकामध्ये अनिल अंजनकर, गजानन सुरोशे, अतुल मेहकरकर, जयंत दलाल, अथर्व जाधव, निशांत अंजनकर, विशाल बट्टकर, आनंद निलगिरी, सोमेश देशमुख, शुभंग गवई, शैलेश बनसोड, संदी प जाधव, अमोल जाधव, रजत वानखेडे यांनी अभिनय केला. नाटकाचे नेपथ्य कलश ग्रूपचे सदस्य विशाल बट्टकर, आनंद निलगिरी, सोमेश देशमुख, शुभंग गवई, शैलेश बनसोड, संदीप जाधव, अमोल जाधव, रजत वानखेडे यांनी परिश्रम करुन लावले. संगीत विजय सोनोने, प्रकाश योजना मनोज नांद्रेकर, रंगभुषा व वेषभुषा विशाल बट्टकर यांनी केले. नाटकाच्या यशस्वितेसाठी अमोल कुलकर्णी, लक्ष्मीकांत गोंदकर, योगेश बांगडभट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. या नाटकाने बुलडाण्याच्या नाट्यक्षेत्राला आणखी एक पुरस्कार मिळवून दिला आहे.
राज्य नाट्य स्पर्धेत बुलडाण्याचा झेंडा
By admin | Published: December 04, 2014 12:51 AM