लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आजार बरा करण्याच्या नावाखाली सिंधी कॅम्पमधील युवतीला दीड लाख रुपयांनी गंडविणार्या महिलेने सराफा व्यावसायिकांना विनापावती सोने विकल्यानंतर खदान पोलिसांनी सराफा व्यावसायिक व मध्यस्थीस गुरुवारी अटक केली. प्रशांत सराफ असे सराफाचे नाव आहे.सिंधी कॅम्पमधील पक्की खोली रहिवासी काजल कमलकुमार चंदवानी (२७) या युवतीच्या घरी गत १५ वर्षांपूर्वी निमवाडी परिसरातील रहिवासी आरती संतोष खरे नामक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. आपल्याला काळी जादू येते, असे म्हणून आरतीने काजलला खंडणी घेत होती. काजलचे लग्न झाल्यानं तरही आरतीने तिच्या घरी जाऊन या ३00 ग्रॅमचे दागिने धमकी देऊन आणल्यानंतर हे सोने जाकीर अली शहादत अली याच्या मध्यस्थीने सराफा व्यावसायिक प्रशांत सराफ याला विकले होते. प्रशांत सराफ या व्यावसायिकाने कोणतीही पावती न बघता सोन्याची बेकायदा खरेदी केली होती, त्यामुळे या दोघांनाही खदान पोलिसांनी अटक केली. -
सराफा व्यावसायिक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:13 AM