लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोट्यवधी रुपये खर्च करूनही कोल्हापुरी बंधार्याचा सिंचनासाठी काहीच उपयोग झाला नाही. ही वस्तुस्थिती राज्यभरात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आहे. जिल्हा परिषदेच्या कामांचा मलिदा लाटणार्या लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरसह जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग आता राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता यापुढे जलसंधारण अधिकारी होतील. या विभागाकडून ६00 हेक्टरपर्यंंंत सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. १५ जुलैपर्यंंंत अधिकारी-कर्मचार्यांना विभागात समायोजित होण्यासाठी विकल्प देण्यात आला आहे. राज्यात मृद व जलसंधारण विभागाची नव्याने निर्मिती केली जात आहे. त्यासाठी विभागाची संपूर्ण रचना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ३१ मे रोजीच्या शासन निर्णयात निश्चित केली आहे. त्यानुसार कृषी विभागातील ९९६७ अधिकारी-कर्मचारी, जलसंपदा विभागातील लघुपाटबंधारेची ३८१ पदे, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात राज्यात कार्यरत २,९५९ पदांचे समायोजन केले जात आहे. त्यासाठी संबंधितांना १५ जुलैपर्यंंंत समाविष्ट होण्याचा विकल्प देण्यात आला. या कालावधीत विकल्प देणार्यांना सेवाज्येष्ठतेचा लाभ मिळेल, त्यानंतर आलेल्यांची सेवाज्येष्ठता गृहित धरली जाणार नाही, असेही निर्णयात नमूद केले आहे.
बंधारे आता जलसंधारणची अपत्ये!
By admin | Published: June 05, 2017 2:00 AM