शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

विद्यार्थ्यांंच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!

By admin | Published: December 02, 2015 2:43 AM

ओझे कमी करण्याची मुदत संपली : दोन संच देण्यास पुस्तकांचाही तुटवडा

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, हे ओझे कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंंतची मुदत देण्यातआली होती. त्यासाठी राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना दोन पुस्तक संच देण्याचा उपक्रम राबविण्यात आला; मात्र पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याने मुदत संपूनही विद्यार्थ्यांंवर दप्तरांचे ओझे कायम दिसून येत आहे.राज्यात ५२ हजार ९९१ प्राथमिक व २८ हजार १४५ उच्च प्राथमिक शाळा आहेत. मुलांचे दप्तर उघडले की, त्यात पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, सहा मुख्य विषयांची पुस्तके, खासगी प्रकाशकांच्या वर्कबुक्स, सर्व विषयांच्या वर्गपाठ-गृहपाठाच्या २00-२00 पानी वह्या, निबंधाच्या वह्या, कंपासपेटी, निरनिराळ्या रंगपेट्या व इतर खेळण्याचे साहित्य घेऊन मुलं शाळेत येतात. याशिवाय शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव असल्यास त्याचे वेगवेगळे पोशाख आणि साहित्यही आणावे लागते. शाळा सुटल्यावर लगेच वर्ग भरत असल्यास त्याच्या वह्या सोबत असतात. उपयुक्तता न तपासता हे ओझे विद्यार्थ्यांंना वाहावे लागते. विद्यार्थ्यांंंच्या बौद्धीक वाढीबरोबरच निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांंना तणावमुक्त करून आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंंतच्या विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय २१ जुलै रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ३0 नोव्हेंबरपर्यंंंत राज्यभरातील शाळांना करावी लागणार होती. त्यानुसार राज्यातील काही शाळांनी शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (एक विद्यार्थ्याच्या घरी आणि दुसरा शाळेत) करावेत; असा उपक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थ्यांंंना पुस्तकाचे दोन संच आवश्यक आहेत. मात्र, पुस्तकांचा तुटवडा असल्याने राज्यातील काहीच शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबाजावणी होऊ शकली आहे. दरम्यान दप्तराचे ओझे कमी करण्याची मुदत संपुणही राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कायम असल्याचे दिसून येत आहे.