म्हणून महागला वडापाव
वडापावसाठी प्रामुख्याने तेल आणि बेसनची गरज भासते, मात्र मागील काही दिवसांत तेल आणि बेसनाचे दर वाढले आहेत. तेलाच्या दरात साधारण २० ते ३० टक्क्यांनी, तर तर बेसनाच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत.
आमच्यासाठी एकवेळचे जेवण
घराच्या बाहेर कामानिमित्त रोजच पडावे लागते. ग्रामीण भागातील बससेवा पहिल्यासारखी नसल्याने आता वाढीव भावाने का होईना वडापाव खाऊनच दिवस घालवावा लागत आहे. इतर पदार्थाच्या तुलनेत वडापाव पोटाला आधार देणारा आहे.
- सचिन पाटील, नागरिक
कोरोनाचा मोठा फटका
कोरोनानंतर वडापावसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. म्हणून पहिल्या किमतीत वडापाव देणे आम्हाला परवडत नसून सध्या ग्राहक कमी झाल्याने दरवाढ करावी लागली.
- योगेश देशमुख, वडापाव विक्रेते