लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजाननपेठमधील एसबीआय कॉलनीमधील रहिवासी डॉ. भारती श्याम हिवरकर या सवरेपचार रुग्णालयामध्ये ड्युटीवर असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत रोख रकमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. चोर्यांचे सत्र सुरूच असताना कडेकोट नाकाबंदी पोलिसांनी केली; मात्र या नाकाबंदीमध्येही मोठी चोरी झाली.डॉ. भारती हिवरकर यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी सोमवारी दुपारी प्रवेश करून कपाटातील लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये ३५ हजार रुपये रोख आणि ३१ हजार रुपयांचे दागिने व अन्य साहित्य चोरट्यांनी पळविले. भरदुपारी घडलेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोरक्षण रोडवरील गोदावरी अपार्टमेंट, विजय हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी नवल रामगोपाल चितलांगे (४५) यांच्या घरातील कपाटातून नगदी ३२ हजार ५00 रुपये व सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण ३८ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
‘एसपीं’नी केली पोलीस अधिकार्यांची कानउघाडणी!लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात चोरट्यांनी प्रचंड हैदोस घालीत १७ दिवसांत १५ घरफोड्या केल्या असून, पोलिसिंगचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पोलीस अधिकार्यांची सोमवारी तातडीने बैठक घेऊन कानउघाडणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेच तीन तास नाकाबंदी लावण्यात आली. पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले; मात्र त्यानंतरही भरदिवसा दोन घरफोड्या झाल्याच.जिल्हय़ाची कायदा व सुव्यवस्था गत काही महिन्यांपासून प्रचंड बिघडली आहे. गुन्हेगारांवरील पोलिसांचे नियंत्रण सुटले असून, विद्यार्थिनीची छेडखानी, हुक्का पार्लर, चिमुकलीची हत्या, गुटखा माफियांचा हैदोस, जुगार अड्डे, क्लब, खुलेआम सुरू झाले आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून, याच अवैध धंद्यामधून प्रचंड वाद वाढत आहेत. तीन वर्षांपासून शांत असलेल्या भांडपुर्यातही दंगल झाली असून, याची दखल गुप्तचर यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे अकोला पोलिसांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोर्यांचे सत्र सुरूच आहे, मात्र तरीही पोलिसांना त्याचे घेणे-देणे नसल्याचेच दिसून येत आहे. खंडण्या व गुंडगिरी प्रचंड वाढली असताना पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमतने वेधले होते लक्ष ‘लोकमत’ने सोमवारीच १७ दिवसांत १५ चोर्या झाल्याचे प्रकाशित करून अकोला पेालिसिंगचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वास्तव चित्र समोर आणले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस अधिकार्यांची तातडीने बैठक घेऊन नाकाबंदी लावली; मात्र या तीन तासांच्या नाकाबंदीतही भरदिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांवर आता गुन्हेगार वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.