आकोट, दि. २४-: शहरातील कालंका चौक परिसरातील एका घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा ६७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. सदर घरफोडीची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलीस सूत्रानुसार, शनवारपुरा कालंका चौक परिसरातील दिनेश जुगलकिशोर दज्जुका हे २३ ऑक्टोबरला घराला कुलूप लावून अकोला येथे गेले होते. रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व २८ हजार रुपये नगदी असा एकूण ६७ हजार ३00 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वानपथकाला पाचारण केले होते. दज्जुका यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत. विशेष म्हणजे दज्जुका यांचे घर भर रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी आरओरड झाल्यास घराबाहेर निघू नये याकरिता इतर घरांच्या घराबाहेरील कडीकोंडा लावून ठेवल्याची माहिती आहे.
आकोटात घरफोडी; ६७ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Published: October 25, 2016 3:02 AM