अकोला: आजरोजी शहराच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामध्ये डांबरी रस्त्यांचादेखील समावेश आहे. येत्या २० मार्च रोजी आनंद, उत्साहाचा सण अशी ओळख असणाऱ्या होळीनिमित्त वाईट विचारांचे दहन केले जाते. त्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदले जातात. त्यामुळे अकोलेकरांनो होळी पेटवा; पण रस्त्यावर नको, असे कळकळीचे आवाहन महापालिका प्रशासनाने सोमवारी केले आहे.शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू आहेत. डांबरी रस्त्यांसोबतच सिमेंट रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. यादरम्यान, येत्या २० मार्च रोजी होळीचा सण आहे. होळीच्या दिवशी वाईट विचारांचा नाश करण्याच्या उद्देशातून होळी पेटवल्या जाते. प्रभागातील खुली जागा, ओपन स्पेस, मैदानावर होळी पेटवणे अपेक्षित असताना थेट रस्त्यावर खड्डे खोदून होळी पेटवली जाते. शहरात तयार होणाºया रस्त्यांची नीगा राखणे अकोलेकरांचेसुद्धा कर्तव्य आहे. होळी रस्त्याच्या बाजूला पेटवल्यास रस्ते खराब होणार नाहीत. त्यामुळे अकोलेकरांनो होळी पेटवा, रंगोत्सवाचा आनंद घ्या; मात्र रस्त्यावर नको, असे आवाहन मनपाचे शहर अभियंता सुरेश हुंगे यांनी केले आहे.