तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी पर्वतराव देशमुख यांनी केली आहे.
हातरूण येथील शेतकरी पर्वतराव देशमुख यांची अंदुरा भाग दोन शेतशिवारात गट नंबर २२७ मध्ये शेती असून त्यांनी ज्वारीची पेरणी केली होती. या शेतातील १२५० पेढी कडबा त्यांनी शेतात ठेवला होता. शनिवारी लागलेल्या आगीत १२५० पेढ्या कडबा जळून खाक झाला. कडब्याला आग लागल्याने तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी पर्वतराव देशमुख यांनी बोलताना दिली. आगीत कडबा जळाल्याची माहिती मिळताच तलाठी सचिन काकडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानाचा पंचनामा केला. या वेळी शेतकरी पर्वतराव देशमुख, कोतवाल राजू डाबेराव हजर होते. नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी पर्वतराव देशमुख यांनी केली आहे.