लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : अकोल्यावरून अकोटकडे जाणार्या एका धावत्या कारला रविवारी सकाळी ११ वाजता चोहोट्टा बाजार येथे आग लागल्याने नागरिकांना द बर्निंग कारचा थरार अनुभवास मिळाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगी त कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील तिघांना कुठलीही इजा झाली नाही. अकोलावरून कार क्र.एमएच ३0 टी ४८ अकोटकडे जात होती. दरम्यान, चोहोट्टा बाजार येथून जात असताना या कारने शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट घेतला. त्यामुळे घटनास्थळावर नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ही कार अकोला येथील प्रदीप वामनराव अढाऊ यांची होती. आगीची पूर्वकल्पना आल्याने कारमधील तिघेही बाहेर पडल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. परिसरातील युवकांनी धावपळ करीत पेटलेली कार विझविण्यासाठी तेथून जाणार्या एका पाण्याच्या टँकरला अडवले व त्यातील पाण्याने गाडीला विझविण्यात यश मिळवले. यावेळी अकोला व अकोटकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. आगीमुळे कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
चोहोट्टा बाजार येथे ‘द बर्निंग कार’चा थरार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 8:11 PM
अकोल्यावरून अकोटकडे जाणार्या एका धावत्या कारला रविवारी सकाळी ११ वाजता चोहोट्टा बाजार येथे आग लागल्याने नागरिकांना द बर्निंग कारचा थरार अनुभवास मिळाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगी त कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील तिघांना कुठलीही इजा झाली नाही.
ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे लागली कारला आग