-----------------------------------
कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत धनादेश वाटप
हाता:बाळापूर तहसील अंतर्गत ग्रामीण भागात कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. बाळापूरचे तहसीलदार मुकुंदे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांच्याहस्ते निंबा येथील उमा सुरेश राठोड यांना धनादेश दिला.(फोटो)
----------------------
आगर येथे कोंबड्यांचा मृत्यू
आगर : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. आगर येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. बर्ड फ्लूच्या धास्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.(फोटो)
-----------------------
हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण
बाळापूर : तालुक्यात यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे.सद्य:स्थितीत हरभरा गाठे धरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.
--------------------
हरभऱ्याची सोंगणी सुरू
बोरगावमंजू : खरप बु., घुसर परिसरात हरभऱ्याची सोंगणी सुरू आहे. हरभऱ्याची सोंगणी व कापूस वेचणी एकाच वेळी आल्याने परिसराती मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावी लागत आहे.
---------------------
देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव: देगाव-वाडेगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
------------------------
वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला
म्हातोडी: परिसरातील सांगळूद, म्हातोडी, दोनवाडा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी चिंतातूर झाले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
बस प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन
वाडेगाव: अनलॉक प्रक्रियेत बससेवा पूर्ण क्षमतेने अटी व शर्थीच्या आधारे सुरू करण्यात येत आहे.बस मध्ये चढताना व उतरताना कोरोनाविषयक नियमांचे पालन केल्या जात नसल्याचे चित्र वाडेगाव येथील बसस्थानकात दिसून आले.
-------------------------