अकोला : संचारबंदी असल्याने एसटी बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे. प्रवाशी संख्या कमी असल्याने महामंडळाने ग्रामीण भागातील बसफेऱ्या कमी केल्या आहेत. जिल्ह्यातील दोन-तीन तालुक्यात बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
----------------------------------------------------------
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे
अकोला : ग्रामीण भागातील कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलद सेवा मिळावी हा शासनाचा उदात्त हेतू आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरड कायम असते. समस्या सोडविण्याची मागणी आहे.
---------------------------------------------------------
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी
अकोला : एसटी महामंडळाचे कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करीत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी जीव धोक्यात टाकून प्रवाशांना पोहोचवून देतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चालक-वाहक कोरोनाग्रस्त आढळले आहे.
-------------------------------------------------------