पातूर : भरधाव बसने समोरुन येत असलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने तीन जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना पातूर-वाशिम महामार्गावरील घाटातील म्हसोबा मंदिराजवळ १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.परभणी डेपोची बस क्रमांक एमएच २० बीएल २३८० ही वाशिमकडून पातुरकडे येत होती. दरम्यान, पातूर घाटातील वनविभाग पर्यटन बोर्डाजवळ वाशिमकडे जात असलेल्या ट्रकला बसने समोरासमोर जबर धडक दिली. बसने धडक देताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून ट्रकसहीत पोबारा केला तर एसटी बसचे चालक व वाहकानेसुदधा जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात सीताराम नामदेव कांबळे (६२) रा. वडप, नारायण गंगाराम गायकवाड रा. मालेगाव गंभीर जखमी झाले तर पंचफुला गुलाबराव देशमुख रा. आंधुळ, गुलाबराव दयाराम देशमुख, वैदेही विलास अंभोरे रा. वाशिम, उल्हास रामकृष्ण अंभोरे रा. वाशिम, जनाबाई माधव देवकते रा. वाशिम, सारिका इंगळे, विनोद आसराम येवले रा. पुसेगाव, तेजराव वामनराव पारणे, माधुरी हातोले रा. अकोला, अजाबराव सरनाईक, हुरजहॉ बेगम रा. रोहीदा, खैरमोहम्मद खान, राधा प्रकाश बग्गन रा. मंगरुळपीर, प्रकाश बग्गन रा. मंगरुळपीर हे जखमी झाले.अपघातानंतर त्या मार्गावरून जात असलेल्या हदगाव डेपोच्या बस क्रमांक एमएच २० बीएल ३५२३ चे चालक अमोल भालेराव, वाहक गणेश आडे यांनी जखमींना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले. जखमींवर डॉ. चिराग रेवाळे यांनी उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोला रवाना केले. यावेळी जखमींना दुलेखान युसुफखान, मोतीखाँ युनुसखॉ, मुमताज पहेलवान आदींनी त्वरित मदत मिळविण्याकरिता मदत केली. वृत्त लिहिस्तोवर पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार डी.