- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तब्बल तीन महिने बंद असल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या परिवहन महामंडळाने यामधून बाहेर येण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. ज्या बसेसच्या फेऱ्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असताना गावात, शहरात धावतात, त्या ठिकाणच्या बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एसटी बसेस बंद असल्याने तसेच आताही बहुतांश जिल्ह्यात एसटीची चाके थांबलेलीच आहेत.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देण्यासही महामंडळाला अडचणी येत असल्याने या आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विविध खर्च कमी करत एसटीला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.महामंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबत ज्या गावात किंवा शहरात धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये ४० टक्केपेक्षा कमी प्रवासी आहेत, त्या बसफेऱ्याच रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सध्या जो दैनंदिन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, त्यामधून बाहेर येण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आहे.४० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसफेरीतून खर्चासोबतच महामंडळालाही आर्थिक हातभार लागणार असल्याची खात्री महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना आहे.
२० पेक्षा अधिक प्रवाशांची गरजकोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एका एसटी बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी याप्रमाणे २३ ते २५ प्रवासी प्रवास करतील असे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र काही गावांमध्ये किंवा शहरात एका बसमध्ये केवळ १० ते १२ च प्रवासी प्रवास करीत असल्याने अशा बसफेºयांमुळे महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या बसफेºयांमुळे तोट्यात येणाºया महामंडळाला वाचविण्यासाठी कमीत कमी २० पेक्षा अधिक प्रवासी असणे गरजेचे असल्याचाही निर्णय महामंडळाने घेतला आहे.डिझेलची दरवाढही मुळावरआधीच कोरोनाच्या संकटाने बंद असलेल्या एसटीची चाके फिरण्यास सुरुवात झाली; मात्र त्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटीला आणखी फटका बसत आहे. आधीच कमी प्रवासी संख्येवर एसटी बसेस धावत असताना त्यातच डिझेलची दरवाढ झाल्यानेही एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.