कोरोनासारख्या महामारीसमोर शहरातील मोठ्या व्यावसायिकांनी शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊनच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत आपली दुकानदारी सुरू ठेवली आहे. त्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना हवे ते मिळत आहे. दुकानदार ग्राहक आले की, शटर वर करून ग्राहकाला आतमध्ये पाठवून व्यवसाय करीत आहेत. किरकोळ व्यावसायिकांकडे तशी काही व्यवस्था नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पोलिसांची गस्त सुरू झाली की, मोठे दुकानदार अलर्ट होतात. पोलिसांचे वाहन गेले की जैसे थे, तसेच मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बसस्टँड रोड व भाजी मार्केट रोड, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यावर वेगळी परिस्थिती आहे. याठिकाणी दुकाने उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे. कारवाई करीत असताना राजकीय नेत्यांकडून प्रशासन, अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे. शहरातील अनेक दुकानदारांनी अनेकदा उल्लंघन केले. मात्र, किरकोळ दंड आकारण्यात येता; परंतु मोठ्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याकडे प्रशासनासह पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
फोटो : मेल फोटोत