शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

तूर खरेदीत असहकार पुकारल्यास ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करा!

By ram.deshpande | Published: July 26, 2017 2:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तूर खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर ग्रेडरने रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अकोला, अकोट व तेल्हारा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिला.टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया मंगळवार, ...

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांचा एसडीओ, तहसीलदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तूर खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर ग्रेडरने रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अकोला, अकोट व तेल्हारा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिला.टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया मंगळवार, २५ जुलैपासून जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २४ जुलै रोजी दिला होता; परंतु २५ जुलै रोजी खरेदी केंद्रांवर ग्रेडर रुजू झाले झाले नाही.तसेच तूर खरेदी प्रक्रियेत तूर उत्पादक शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम करण्यास तहसीलदार -नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने नकार देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात २५ जुलैपासून तूर खरेदी सुरू होऊ शकली नाही. या पृष्ठभूमीवर २६ जुलैपासून खरेदी केंद्रांवर संबंधित ग्रेडरनी रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया आणि शासकीय कामात अडथळा आणणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोला, अकोट व तेल्हारा येथील संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिला.आजपासून होणार खरेदी !शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम नायब तहसीलदारांकडे देण्यात आले; मात्र त्या कामावर तहसीलदार -नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आला. तसेच ग्रेडर खरेदी केंद्रांवर रुजू झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर २५ जुलैपासून खरेदी सुरू झाली नाही. २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापासून खरेदी सुरू होणार आहे.तपासणीचे काम कृषी व सहकार विभागाकडे!त्यामुळे तूर खरेदीसाठी शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम कृषी विभाग व सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालय अंतर्गत अधिकारी -कर्मचाºयांकडे देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.प्रहार संघटना आक्रमक; बाजार समितीमध्ये ठिय्या!२५ जुलै रोजी तूर खरेदी सुरू न झाल्याच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ठिय्या दिला. बाजार समिती सचिवांसोबत चर्चेनंतर घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेत अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची भेट घेऊन तूर खरेदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. आंदोलनात प्रहार संघटनेचे नीलेश ठोकळ, श्याम राऊत, संदीप पाटील, सोपान कुटाळे, सुहास साबे, कुणाल जाधव, अतुल काळणे व पदाधिकारी सहभागी होते.खरेदी केंद्रांवर ग्रेडरनी रुजू व्हावे, अन्यथा कामात अडथळा आणणाºया ग्रेडरविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश एसडीओ-तहसीलदारांना देण्यात आला आहे. तसेच शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम कृषी विभाग व सहकार विभागांतर्गत अधिकारी-कर्मचाºयांकडे देण्यात आले असून, २६ जुलपासून जिल्ह्यात तूर खरेदी सुरू करण्यात येणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी