घर भाड्याने देताना ही घ्या काळजी
घर भाड्याने देताना ११ महिन्यांचा करार करून घ्यावा, तसेच भाडेकरूंचे ओळखपत्र व त्यांची इत्थंभूत माहिती घ्यावी़ ११ महिन्यांचा करार संपुष्टात आल्यानंतर शक्यताेवर भाडेकरू बदलावा़ त्यामुळे तुमच्या घरावर ताबा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाईल़ तर काेण भाडेकरून ठेवला याच्या कराराची एक प्रत पाेलिसांनाही द्यावी़ त्यामुळे तुम्ही आधीच सुरक्षित व्हाल व तुमच्या घरावर कुणीही ताबा करू शकणार नाही़
घर बळकावल्याच्या तक्रारी
२०१९ ६३
२०२० ४१
२०२१ २६
९६ प्रकरणे न्यायालयात
घर बळकावल्याचे तसेच दुकानावर ताबा केल्याची प्रकरणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेेली आहेत़ अकाेला जिल्ह्यातील विविध न्यायालयांत अशा प्रकारे ९६ पेक्षा अधिक प्रकरणे असल्याची माहिती आहे़ तर अशा प्रकारचे दिवाणी दावे लाेकअदालतमध्ये माेठ्या प्रमाणात निकाली काढण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली़ स्थावर मालमत्तेचे प्रकरण न्यायालयात वर्षानुवर्षे चालत असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे़
भाडेकरूंनी घर बळकावल्याच्या तक्रारी प्राप्त हाेतात़ मात्र, अशा प्रकारचे प्रकरण प्रचंड किचकट असल्याने पाेलीस त्यांची प्रक्रिया पूर्ण करतात़ त्यानंतर बहुतांश तक्रारकर्ते अशा प्रकारचा वाद हा दिवाणी न्यायालयात दाखल करतात़ त्या ठिकाणी दाेन्ही पक्षांची माहिती घेतल्या जाते़ सर्व दस्तऐवजांची तपासणी हाेते व बऱ्याच वर्षांनंतर अशा प्रकारचे वाद निकाली काढण्यात येतात़
माेनिका राऊत
अपर पाेलीस अधीक्षक, अकाेला