शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

मजुरांकडून प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:33 PM

गावात मजूर लावून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी अभियान राबवल्यानंतर आता गावात मजूर लावून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. त्यासाठीची मजुरी ग्रामपंचायतीनेच अदा करण्याचेही म्हटले आहे.राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी (महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) प्लास्टिक गोळा करावे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. श्रमदानातून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याचे वजन करून ग्रामपंचायतीमध्ये साठवण्यात आला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात समाविष्ट गावांतून १ ट्रक (४ टन) प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी शाळांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवण्यात आली. अनेक गावांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गावांमध्ये गोळा केलेल्या कचऱ्याची आकडेवारीही तयार झाली. त्यानंतर प्लास्टिक गोळा करण्याचे काम पुढेही सुरूच ठेवावे, यासाठी ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत प्लास्टिक गोळा करण्याचा विशेष कार्यक्रम घेण्याचा आदेश देण्यात आला.त्यामध्ये लोकसहभाग घ्यावा, घरोघरी पडलेले प्लास्टिक गोळा करावे, ग्रामपंचायतच्या हद्दीतील रस्ते, नाल्या, गावठाण क्षेत्र, समाजमंदिर, मंदिर, मंगल कार्यालय परिसरातील कचराही गोळा केला जाणार आहे. त्यासाठी मोहिमेच्या काळात मजूर लावून प्लास्टिक गोळा करावे, त्यांना देय मजुरी ग्रामपंचायतकडून दिली जाणार आहे. गोळा झालेल्या प्लास्टिक कचºयाचा अहवाल पाणी व स्वच्छता कक्षाकडे देण्याचेही बजावले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPlastic banप्लॅस्टिक बंदी