शहरासह जिल्ह्यातील ऑटोरिक्षामध्ये महिला तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवती यांची छेड काढण्यात येउ नये तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तणूक करू नये याकरिता अकोला शहर वाहतूक शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ या स्टीकरमध्ये ऑटो चालकाचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर तसेच ऑटोक्रमांक लिहिलेला असून अकोला पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक १००, तसेच पोलीस मदत क्रमांक ११२, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक ०७२४२४३५५०० या क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे़ जर एखाद्या महिलेला किंवा युवतीला ऑटोमध्ये प्रवास करताना त्रास झाला तर त्यांनी ऑटोमध्ये दिलेल्या क्रमांकावर त्वरित फोन केल्यास त्यांना पोलीस प्रशासन तातडीने मदत करणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी सांगितले़
ऑटाेचालकांची कुंडली लागणार ऑटाेत
बहुतांश वेळा ऑटाेचालकांकडून गुन्हे घडत असल्याचे समाेर आले आहे़ त्यामुळे ऑटाेचालकाचे नाव, गाव, पत्ता, माेबाईल क्रमांक व इतर संपूर्ण माहिती असलेला तक्ता ऑटाेमध्ये लावण्यात येत आहे़ याच तक्त्यावर पाेलीस हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ऑटाेचालकांना कुठेही अनुचित प्रकार दिसल्यास त्यांनी तातडीने पाेलिसांना माहिती द्यावी म्हणूनही ऑटाेचालकांपासून या माेहिमेची सुरुवात करण्यात आली आहे़