आशिष गावंडे/ अकोलाजुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचे जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांना अधिकार आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरु असली तरी अद्यापही जिल्हाप्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही. नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी कॅनॉल रस्त्यासाठी ६ कोटींची तरतूद केली असताना जिल्हाप्रशासन व महापालिकेला कॅनॉलच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग म्हणून जुने शहराकडे पाहिल्या जाते. जुने शहरात डाबकी रोड, जुना बाळापूर रोड व हरिहरपेठ मार्गाचा प्रमुख रस्ते म्हणून वापर होतो. सर्वाधिक वर्दळ डाबकी रोडवर राहत असून अरुंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार दैनंदिन झाले आहेत. जुने शहरातील वाहतूक वळवण्यासाठी कॅनॉल रस्त्याचा एकमेव पर्याय आहे. डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३०० मीटर अंतराच्या कॅनॉल रस्त्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त दिपक चौधरी यांच्या कालावधीत निविदा प्रकाशित करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाने १ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली होती. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या कॅनॉलची जागा रस्ते विकासासाठी मनपाकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते. यासंदर्भात मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला. कॅनॉल रस्त्याची जागा मनपाकडे हस्तांतरित करण्याचे जिल्हाधिकाºयांना सर्वाधिकार आहेत. जुने शहरातील वाहतुकीची समस्या ध्यानात घेता याविषयी जिल्हाप्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.६ कोटींची तरतूद केली पण...जुने शहरातील अरूंद रस्ते,वाहतुकीची कोंडी पाहता नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी वर्षभरापूर्वी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केली. पालकमंत्र्यांनी निधीची तरतूद केल्यावरही जिल्हाप्रशासन व मनपा प्रशासनाकडून रस्ते हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विलंब होतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणांचा लेटलतीफ कारभार पाहता ६ कोटींचा निधी इतरत्र वळती करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. कॅनॉल अस्तित्वात नाही,तरीही विलंब!शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १०० फुट रूंदीच्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाप्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क रण्याची गरज आहे.
कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:09 PM
शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १०० फुट रूंदीच्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाप्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क रण्याची गरज आहे.
ठळक मुद्देमनपा ‘वेटिंग’वर;जिल्हाधिकाºयांच्या भूमिकेकडे लक्ष