अकोला, दि. १२- कॅनरा बँकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती आणि इतरही तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी श्री. स्वेन यांनी दर्यापूर येथील तक्रारक र्त्याला कळविले आहे. त्यामुळे आता या भरतीच्या नावावर मलिदा लाटत नातेवाइकांचा भरणा करणार्यांचे धाबे दणाणले आहे. नवीन नियमानुसार, डिसेंबर २0१४ नंतर कॅनरा बँकेच्या कोणत्याही शाखेत अनधिकृत व्यक्तींना शिपाई-मदतनीस पदावर ठेवता येत नाही. त्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाने सर्वच बँक व्यवस्थापकांकडून तसे घोषणापत्र लिहून घेतलेले आहे. त्यानंतरही राज्यात शेकडो अनधिकृत कर्मचार्यांकडूनच ही कामे करून घेण्यात येत आहेत. त्यातच नियम आणि भरती प्रक्रियेचे निकष डावलत त्याच अनधिकृत व्यक्तींना कायम करण्याची तयारीही सुरू आहे. ही बाब ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरली. सोबतच दर्यापूर येथील तक्रारकर्त्यांनी कात्रणासह बँक व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या. बँकेच्या नवीन शाखांमध्ये शेकडो कर्मचारी अनधिकृत आहेत. आता त्यांनाच कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची तयारी झाली आहे. बँकेच्या एका संघटना पदाधिकार्यांनी त्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यावर बँकेच्या पुणे येथील राज्याच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी श्री. स्वेन यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे तक्रारकर्त्यांना कळविले. माना, मूर्तिजापुरात एकाच आडनावाचे कर्मचारीकॅनरा बँकेत चतुर्थश्रेणी पदभरतीमध्ये बँकेच्या नागपूर येथून नवृत्त झालेल्या एका अधिकार्याची मक्तेदारी आहे. अमरावती विभागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यक्तींना नियुक्ती देण्यासाठी व्यवहार करण्यात आलेला आहे. याबाबतची खातरजमा केल्यास बँकेच्या मूर्तिजापूर आणि माना शाखेत एकाच आडनावाचे शिपाई-मदतनीस पदावर असल्याची माहिती आहे. त्यांनाही नोकरीत कायम करण्यासाठी माहिती सादर करण्यात आली आहे.
कॅनरा बँक तक्रारींची चौकशी करणार!
By admin | Published: March 13, 2017 2:41 AM