अकोला : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्या खासदार आदर्श ग्राम योजनेत खासदार संजय धोत्रे यांनी आकोट तालुक्यातील केळीवेळी या गावाची निवड केली आहे. त्यानुसार केळीवेळी येथील मूलभूत सोयी-सुविधा आणि करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच अधिकार्यांची बैठक घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्या या योजनेत प्रत्येक खासदाराने १0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या एका गावाची निवड करायची आहे. त्यानुषंगाने खासदार संजय धोत्रे यांनी ५ नोव्हेंबर रोजी खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गतल आकोट तालुक्यातील केळीवेळी या गावाची निवड केली. खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या या गावात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व इतर सोयी-सुविधांच्या कामांचा समावेश आहे. ४७ गावांमधून केळीवेळीची वर्णी! खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील एका गावाची निवड खासदारांकडून केली जाणार असल्याने, त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ४७ गावांची यादी खासदार संजय धोत्रे यांच्याकडे सादर करण्यात आली होती. या ४७ गावांपैकी खासदार आदर्श ग्राम योजनेत केळीवेळी या गावाची वर्णी लागली आहे.
खासदार आदर्श गाव योजनेत केळीवेळीची निवड
By admin | Published: November 08, 2014 12:11 AM