शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

गांजा माफियांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:23 AM

पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव खुर्द व हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा या दोन ठिकाणावरून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल एक क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केल्यानंतर दोन आरोपींना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव खुर्द येथील रहिवासी राजू सोळंके याच्या निवासस्थावरून कैलास पवार व राजू सोळंके हे दोघे जण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४० किलो गांजा जप्त केला. त्यानंतर या दोघांनी दिलेल्या माहितीवरून हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा येथील रहिवासी शत्रुघ्न चव्हाण यांच्या घरातून तब्बल एक क्विंटल सहा किलो गांजा जप्त केला होता. या दोन कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एक क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केला. सदर गांजाची किंमत सुमारे २३ लाख ३६ हजार रुपये आहे. यामधील बोरवा येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला; मात्र राजू सोळंके रा. आडगाव व कैलास पवार रा. वारी हनुमान या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी