खामगाव : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासाठी लागू असलेली भांडवली सवलत योजना राज्याच्या उर्वरित भागातील ह्यडह्ण प्लस श्रेणीतील कापूस उत्पादक तालुक्यांना लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वात जास्त फायदा राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांना मिळणार आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर तिथेच प्रक्रिया होऊन त्यांना चांगली किंमत मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वस्त्रोद्योगांना १0 टक्के सवलत दिली. जास्तीत जास्त उद्योग उभे राहावे, ही यामागची संकल्पना होती. या योजनेमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात या उद्योगांना चालना मिळाली; मात्र ही योजना तीन विभागासाठी र्मयादित न ठेवता राज्यातील इतर ज्या भागांमध्ये कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते, त्या ठिकाणीही वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने योजना अमलात आणली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात कापूस उत्पादन होते; मात्र येथील कापूस हा गुजरात, मध्यप्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्यात केला जातो. त्यामुळे शेतकर्यांच्या कापसाला कमी किंमत मिळते. त्यावर राज्यातच प्रक्रिया केली तर मोठा नफा मिळेल व शेतकर्यांच्या मालास चांगला बाजारभाव मिळू शकेल. राज्यातील सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. जे नवीन उद्योग उभे राहत आहे, ते टिकविण्यासाठी ही योजना फलदायी ठरणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा कापूस उत्पादकांना आहे.
कापूस उत्पादकांना मिळणारभांडवली सवलत योजना भांडवली सवलत योजना
By admin | Published: September 16, 2014 6:36 PM