मूर्तिजापूर : येथील जुनीवस्ती तेल भगतील भवानी नगर येथे राहाणारे प्रकाश लोहकपुरे यांनी स्टेशन विभागातून दोन डझन केळी विकत घेतली घरी पोहोचल्यावर त्यातील एक केळ खाण्यासाठी घेतले ते सोलून तोडले असता त्यात चक्क औषधी कॅप्सूल निघाल्याने एकच खळबळ उडाली.
बाजाराचा दिवस असल्याने शुक्रवारी २७ अॉगष्ट रोजी प्रकाश लोहकपुरे यांनी घरी नेण्यासाठी दोन डझन केळी विकत घेतली. सदर केळी घेरी नेल्यावर त्यांच्या पत्नीने एक केळ खाण्यासाठी घेतले, केळ संपूर्ण सोलून ते खाण्यासाठी तोडले असता त्यात चक्क कंपनीचे 'औषधी कॅप्सूल' दिसून आले. विशेष म्हणजे दर केळीला कुठलेही छिद्र दिसून आले नसल्याने ही कॅप्सूल केळी मध्ये आली कुठून या बाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. ही कॅप्सूल जर कोणी टाकली असेल तर कॅप्सूल टाकण्या मागे उद्देश काय, या सर्व गोष्टींची अन्न व औषधी प्रशासना मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. दोन डझन केळी मध्ये एकाच फळात ही कॅप्सूल निघाल्याचे लोकमतशी बोलताना लोहकपुरे यांनी सांगितले, सदर केळी मध्ये विषारी कॅप्सूल तर घालण्यात आली नसेल असाही सवाल त्यांनी केला आहे. परीवारातीला सर्व व्यक्तीने केळी खाल्ली असती तर एकाच व्यक्तीला विषबाधा झाली असती. यामुळे केळी खाल्ल्याने विषबाधा झाली नाही हे निष्पन्न झाले असते. हा सगळा प्रकार बेमालूमपणे झाला असता हे निश्चित.