शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

नागपूरहून शेगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 8:28 PM

Car accident, National Highway, Akola या अपघातात कारचालक योगेश गायधानी (४०) याचा जागीच मृत्यू झाला.

पारस: राष्ट्रीय मार्गावर कान्हेरी फाटयानजीक भाविकांच्या झालेल्या कारच्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १२ आॅक्टोबर रोजी पाहटेच्या सुमारास घडली. या अपघात कारमधील इतर पाच जखमी झाले आहेत. हे सर्व जण नागपूरहून शेगाव येथे देवदर्शनासाठी जात होते. नागपूरहून शेगाव येथे काही भाविक कार क्रमांक एम.एच. ४९ बी.६५७७ या कारने जात होते. राष्ट्रीय माहामार्गावरील कान्हेरी गवळी फाट््यानजीक कारचालकाचे डोळे लागल्याने त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला घसरली. हा अपघात एवढा भीषण होता की, कार जवळपास ४०० फूट घासत गेली. या अपघातात कारचालक योगेश गायधानी (४०) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर पाच भाविक जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठीत घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी दिनेश निकम यांच्या फियार्दीवरून कारचालकाविरुद्ध कलम २६९, ३३७, ३०४ अ भादविच्या सहकलम १४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात