शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नांदेड येथील चोरीची गाडी अकोल्यात पकडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:33 PM

तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली.

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांना हरिहरपेठ परिसरात एक चारचाकी वाहन बेवारस आढळून आले. तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली. यासंदर्भात जुने शहर पोलिसांनी नांदेड पोलिसांना माहिती दिली.प्राप्त माहितीनुसार, नांदेड येथील नागगाव तालुक्यातील कुंटूर जिनिंग मिलचे व्यावसायिक नीतेश जैन यांच्याकडे मध्य प्रदेशातील शेंदवा जिल्ह्यातील राजू यादव नामक व्यक्ती वाहन चालक म्हणून कामाला आहे. त्यांचा अर्थिक व्यवहार सतीश ऊर्फ दीपक पालीवाल सांभाळत होता. दरम्यान, जैन यांच्या सांगण्यानुसार दीपक पालीवाल व यादव यांनी २१ डिसेंबर रोजी वजीराबाद परिसरातील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतून ३० लाख रुपये काढले. त्यानंतर घरी परत येत असताना एका वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडविली. कागदपत्रे दाखविण्याचे कारण समोर करून त्यांना उतरण्यास सांगितले. तुमची गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जावी लागणार, असे सांगून पोलीस गाडीत बसला. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि गाडी चालक दोघेही पैसे व गाडी घेऊन फरार झाले. या प्रकरणात नांदेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गाडी थांबविणारा वाहतूक शाखेचा कर्मचारी होता की नाही, याबद्दल नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस चौकशी केली. वाहन चालक राजू यादव आणि सतीश ऊर्फ दीपक पालीवाल यांनीच बानावट कट रचून पैसे व एमएच १९ बीजे ९९७५ क्रमांकाची कार पळवून नेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर राजू यादव याला अटक करण्यात आली, तर सतीश हा फरार आहे. याप्रकरणी नांदेड पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना सतर्क केले. दरम्यान, अकोल्यासह इतर जिल्ह्यांत नाकाबंदी लावण्यात आली. २८ डिसेंबर रोजी जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना हरिहरपेठ भागात एक कार बेवारस आढळली. तपासानंतर ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यावसायिकाची असल्याचे समोर आले. यासंदर्भात अकोला पोलिसांनी नांदेड पोलिसांना माहिती दिली असून, चोरी झालेली कार नांदेड पोलिसांच्या ताब्यात दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड