शिर्ला (जि. अकोला): भरधाव वेगाने जाणारी कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघे जखमी झाल्याची घटना अकोला-वाशिम महामार्गावर पातुर तालुक्यातील शिर्लानजीकच्या वळणावर सकाळी सात वाजताचे सुमारास घडली. या अपघातातात जखमी झालेल्या दोघांना अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेपुणे जिल्ह्यातील भोसरी येथून अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे नातेवाईकांकडे तेरवी साठी निघालेल्या राजेश्वर वानखडे,चंदा वानखडे यांच्या एम.एच. १४ - एच.ओ. ६७५५ क्रमांकाच्या कारला अकोल्याहून पातूर कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक ने शिर्लानजीकच्या अपघात प्रवण वळणावर जोरदार धडक दिली. या अपघातात चालक सुरेश पुंडलिक काळे (रा. नागदा जिल्हा उज्जैन वय ५२) ,चंदा वानखडे (४०, रा उगवा. ह.मु भोसरी, पुणे) यांना मार लागला. जखमींना सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी धर्मराज गावंडे,राहूल पारखडे यांनी मदत केली. पातुर पोलिस निरीक्षक जी. एम. गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दिनकर गुळदे, जमादार जगदिश शिंदे, अनिल भुसारे तपास करीत आहेत.