शिक्षक संघटना संघर्ष समितीने याबाबत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३ ते ६ व ४ ते १४ वयोगटांतील मुलांचे गटागटात नियोजन करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. वाड्या, वस्त्या, घराेघरी जाऊन हे सर्वेक्षण करावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शोध मोहीम स्थगित करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर शोध मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीमध्ये जिल्हा परिषदेतील उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक परिषद प्राथमिक, शिक्षक आघाडी, प्रतिनिधी सभा, ॲक्शन फोर्स, आदिवासी विकास परिषद, केंद्र प्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटनेचा समावेश आहे, असे संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
काेराेना संकट शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:32 AM