हिवरखेड: शाळा म्हणजे औपचारिक शिक्षण देणारी संस्था पण आज कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश तथा शिक्षणप्रणाली सुद्धा प्रभावित झाली आहे. शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरु आहे. शाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष जाऊ शकत नसला तरी विद्यार्थी व शाळा यांची नाळ जोडून ठेवणारा महत्वाचा दुवा म्हणून शालेय गणवेश हा महत्वाची भूमिका पार पाडत असतो, असे प्रतिपादन जि. प. व प्रा शाळा कार्ला बु येथे शालेय गणवेश वाटप कार्यक्रमात मुख्याध्यापिका सरोज न.टिलावत यांनी केले.
शालेय गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा. व्य. समिती अध्यक्ष गोपाल अंभोरे हाेते. यावेळी उपाध्यक्ष वर्षा किशोर सपकाळ, सदस्य संदेश सपकाळ, वर्षा विनोद वानखडे, सरला भास्कर शेंगोकार, पालक विनोद वानखडे, भास्कर शेंगोकार, किशोर सपकाळ,गोपाल चांदुरकर, राजेश होपळ,विठ्ठल होपळ शिक्षण प्रेमी रमेश मानकर उपस्थित होते. गणवेश वाटपाचे नियोजन शाळेतील शिक्षक सुनिता गि-हे, सुलोचना गि-हे, सविता धानोरकर, संजय राठी, दिनेश शेगोकार, संदीप जाधव, उमेश तिडके यांनी सोशियल डिस्टंस् व कोविड नियमांचे पालन करून केले.