अकोला: व्यंगचित्रकार गजानन घोंगडेद्वारा आयोजित विसावी व्यंगचित्र स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडली.‘अ’, ‘ब’, व ‘क’ या तीन गटात झालेल्या स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रभात किड्सच्या राज पंकज जायले याने प्रथम, कोठारी कॉन्व्हेंटच्या कृष्णन तळणीकर द्वितीय, तर कोठारी कॉन्व्हेंटच्या आस्था शरद कोकाटे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. संस्कार रमेश गिºहाडे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ‘ब’ गटात स्कूल आॅफ स्कॉलर्सची ऋची संतोष होनाळे प्रथम, जवाहर नवोदय विद्यालयाची निकिता संजय बंड द्वितीय, भारत विद्यालयाची क्षितिजा रवींद्र गुरव तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. उत्तेजनार्थ पुरस्कार अनुक्रमे सार्थक सुनील राऊत, वैष्णवी सुरेश यादव, योगिता संजय सावरकर, यांना मिळाला. खुल्या गटात गणेश आ. वानखडे याने प्रथम, मौक्तिक रवींद्र इंजनकर याने द्वितीय, तर तृतीय क्रमांक सचिन डोंगरे याने पटकावला. उत्तेजनार्थ पारीतोषिक आदित्य खाडे, आसावरी होनाळे व साक्षी घोगरे यांना मिळाले. या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधू जाधव, कलाध्यापक अविनाश देव व संजय आगाशे उपस्थित होते.या वर्षीचा स्व. नारायणराव ढगे स्मृती विशेष पुरस्कार आलोक भानुदास कस्तुरे, बाल शिवाजी विद्यालय याला मिळाला. मागील दोन वार्षांपासून सुरू केलेल्या सर्वाधिक विद्यार्थी सहभाग शाळा पुरस्कार श्रेणीमध्ये यंदाही तीन पुरस्कार देण्यात आले. प्रथम क्रमांक भारत विद्यालयाला मिळाला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरली स्कूल आॅफ स्कॉलर्स, तर तृतीय क्रमांक बाल शिवाजी शाळेने पटकावला. स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून व्यंगचित्रकार श्री श्रीकांत कोरान्ने, छायाचित्रकार श्री संजय आगाशे व चित्रकार सतीश पिंपळे यांनी काम पाहिले. अमृतवाडी येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ हिंदी साहित्यिक श्री. घनश्याम अग्रवाल, श्री. सतीश पिंपळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अशोक ढेरे यांनी तर आभार प्रदर्शन नीरज आवंडेकर यांनी केले.स्पर्धेचे निमित्त साधून ज्येष्ठ लोककलावंत श्री. वसंतदादा मानवटकर व संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ किबोर्ड प्लेयर रमेशचंद्र उनवणे यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेकरिता बाबारावजी भाकरे (मामा), मंगेश विलायतकर, अमीन मांजरे, धनंजय गावंडे, प्रशांत इंगळे, गणेश खुंटे, मल्ले यांनी सहकार्य केले.