अकोला : किडनी तस्करी प्रकरणातील बनावट दस्तऐवज बनविण्या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी एकास न्यायालयीन कोठडी सुनावली, तर याच प्रकरणातील आणखी एक आरोपी पकडण्यात पोलीसांना यश मिळाले. हरिहरपेठ रहिवासी महेंद्र उर्फ महेश मधुकर तायडे याला खदान पोलीसांनी शनिवारी अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असतात्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान किडणी तस्करी प्रकरणातील प्रमोद शेजव नामक आणखी एक आरोपी पोलीसांच्या जाळ्य़ात सापडला असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
किडणी प्रकरणी एकास न्यायालयीन कोठडी, एका अटक
By admin | Published: February 09, 2016 2:22 AM