लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे. दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत कुटासा येथे आरोपी सोबत मृतक विलास गावंडे यांचा जुना वाद होता. तसेच मृतकाच्या पत्नीला गाणे वाजविणे यावरुन सुध्दा वाद झाले होते. ३ नोव्हेंबर २0१५ रोजी विलास गावंडे पहाटे शौचास जाण्याकरिता गेला होता. दरम्यान, विलास याने आरडाओरड केली, त्यामुळे त्याची पत्नी अनिता गावंडे ही धावत आली असता, तिने पतीला मनोज व पुरण हे दोघेजण कुर्हाडीने वार करीत असल्याचे पाहिले. त्यामुळे आरडाओरड करुन तिने शेजारच्या लोकांना उठविले. कुर्हाडीच्या घावाने गंभीर जखमी झालेल्या विलासला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिता गावंडे हिच्या फिर्यादीवरुन दहीहांडा पोलिसांनी आरोपी मनोज पुरण बागडे, पुरण सखाराम बागडे, संजय पुरण बागडे, राजरत्न ऊर्फ नंदू पुरण बागडे यांच्या विरुद्ध भादंवि ३0२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.आर. दोनकलवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या समोर या हत्याकांडाची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये १0 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवादानंतर न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्याने पुरण बागडे, मनोज बागडे यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच संजय बागडे व राजरत्न बागडे यांच्या विरुद्ध आरोप सिध्द न झाल्यामुळे त्यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. श्याम खोटरे यांनी काम पाहिले.
खून प्रकरणात दोघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:56 AM
जुन्या वितुष्टावरून वाद होऊन कुर्हाडीने कुटासा येथे विलास बाबुसा गावंडे यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी १४ सप्टेंबर रोजी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव पुरण बागडे व मनोज बागडे असे आहे.
ठळक मुद्देकुटासा येथील घटना अकोट न्यायालयाचा निकाल