शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल!

By राजेश शेगोकार | Published: March 04, 2023 6:24 PM

वेगवेगळ्या उत्सवाच्या नांवावर करायचा खंडणीची मागणी!

राजेश शेगोकार, अकोला :-बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या  पारस ग्राम पंचायत च्या  उपसरपंच पती मो.जाफर मो. रफिक याच्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात खंडणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की, बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे पारस येथील पोळा चौकात अकोला येथील उद्योजक निखिल आलिमचंदानी यांचे शासन मान्य किरकोळ विक्री देशी दारूचे दुकान आहे.

या दुकानात दीपक कलाचंद मोटवाणी हे नोकरी करतात.दिनांक3 मार्च २०२३ च्या अंदाजे दुपारी१२ वाजता दरम्यान ५०हजार रुपयांची खंडनी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरुन पारस उपसरपंच पती मो. जाफर मो.रफिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, मो. जाफर मो. रफिक याची पत्नी पारस गावाच्या उपसरपंच पदावर कार्यरत असुन, नमूद आरोपीची पत्नी उपसरपंच पदावर विराजमान झाल्या पासून,मो.जाफर हा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या नावावर पैशाची मागणी देशी दारू दुकान मालक यांच्याकडे करीत होता.सुरवातीच्या काळात त्याची मागणी पूर्णही केली जात होती,परंतु दिवसेंदिवस नमूद आरोपी ची पैशाची मागणी वाढतच गेली,३ मार्च२०२३ च्या अंदाजे १२ वाजता दरम्यान मो.जाफरने दुकानात नोकर असलेल्या दीपकला फोन करून,येत्या २३ तारखेला पारस गावात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी तुझ्या मालकाला सांगून ५०  हजार रुपये देण्याची मागणी केली.

जर रक्कम दिली नाही तर, तुम्हाला पारस गावात दुकान चालु देणार नाही अश्या प्रकारे वक्तव्य करून,जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार दाखल केल्यावरून मो. जाफर याच्यावर भारतीय दंड संहिताचे कलम ३८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी