अकोला: दारू पिण्यासाठी पत्नीने ग्लास व पाणी न दिल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने मित्राच्या सांगण्यावरून पत्नीला जाळून टाकल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी पती व त्याच्या मित्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.माना पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाई गावातील आरोपी संजय रामकृष्ण भटकर(३५) व त्याचा मित्र किरण सुखदेव मुळे(३५) हे १६ डिसेंबर २0१२ रोजी घरी आले. संजय भटकर याने पत्नी स्वाती हिला दारू पिण्यासाठी ग्लास व पाणी मागितले. स्वातीने त्यांना नकार दिला. त्यामुळे पती संजय भटकर हा संतप्त झाला. त्याचा मित्र किरण मुळे याने, माझी पत्नी असती तर तिला फाडून टाकले असते, असे म्हटल्यावर पती संजय आणखीनच संतापला आणि त्याने संतापाच्या भरात घरातील कॅनमधील रॉकेल ओतले आणि पत्नी स्वातीला पेटवून दिले. यात स्वाती ८५ टक्के भाजली. तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला; परंतु स्वातीचा उपचारादरम्यान ३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. माना पोलिसांनी आरोपींना अटक केली. घटनेचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी पती संजय भटकर व मित्र किरण मुळे यांना जन्मठेप व पाच हजार दंड, न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कौर्ट पैरवी पोलीस कर्मचारी अनिल जोशी, संतोष मोरे यांनी केली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ राजेश्वर रेलकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
पत्नीला जाळल्या प्रकरणात पतीसह त्याच्या मित्राला जन्मठेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:39 PM
अकोला: दारू पिण्यासाठी पत्नीने ग्लास व पाणी न दिल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने मित्राच्या सांगण्यावरून पत्नीला जाळून टाकल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी पती व त्याच्या मित्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देसंजय आणखीनच संतापला आणि त्याने संतापाच्या भरात घरातील कॅनमधील रॉकेल ओतले आणि पत्नी स्वातीला पेटवून दिले.. यात स्वाती ८५ टक्के भाजली. तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु स्वातीचा उपचारादरम्यान ३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. माना पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.