लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : लोहारा येथील मन नदीच्या पात्रात २७ मे रोजी दरड कोसळल्याने एक मजूर ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सदर घटना ही कंत्राटदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दुर्लक्षितपणामुळे घडली असून, सर्व दोषींविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी टाकळी खोजबळ येथील अरविंद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार बाळापूर यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे, की बाळापूर तालुक्याच्या हद्दीवरील लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतच्या राम अवतारसिंह सिंघेल यांच्या मालकीचा गट नं. ८०१ या शेताच्या मन नदी काठावरील भागात भूभाग खोदून रेती वाहन क्रमांक एमएच २८-७७१६ यामध्ये रेती भरीत असताना दरड कोसळली.यामध्ये दबल्या गेल्याने गोकूळ कैलास नराळे रा. मानेगाव हा मजूर ठार तर विजय तेजराव चौधरी रा. मानेगाव गंभीररीत्या जखमी झाले होते. ही घटना कंत्राटदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दुर्लक्षितपणामुळे घडली असून, सर्व दोषींविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी टाकळी खोजबळ येथील नरेंद्र मोदी विचार मंचचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार बाळापूर यांच्याकडे केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल. - पी.के. टकाले, नायब तहसीलदार,बाळापूर.
कंत्राटदारासह महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा!
By admin | Published: July 03, 2017 1:57 AM