अकोला, दि. २२- नगरपालिका निवडणुकांमध्ये अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्हय़ात आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव निवडणूक असलेल्या ठिकाणी तहसील स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा आदेश विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी अकोला येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला शुक्रवारी दिला.नगरपालिका निवडणुकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, २४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांना जात उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी विभागीय जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पावती जोडावी लागणार आहे. या पृष्ठभूमीवर नगरपालिका निवडणुकांमध्ये आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्हय़ातील नगरपालिका निवडणूक होत असलेल्या ठिकाणी तहसील स्तरावर इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी अकोला येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांना दिला. त्यानुसार अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील नगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी अकोल्यातील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात येण्याची गरज राहणार नसून, निवडणूक असलेल्या ठिकाणी संबंधित तहसील कार्यालयात उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.नगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव निवडणूक असलेल्या ठिकाणी तहसील स्तरावर स्वीकारण्याचा आदेश अकोला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांना दिला. अशीच व्यवस्था अमरावती व यवतमाळ जिल्हय़ातही करण्यात येत आहे.-जे.पी. गुप्ताविभागीय आयुक्त, अमरावती विभाग
जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारणार तहसील स्तरावर!
By admin | Published: October 23, 2016 2:11 AM