पारस : बाळापूर तालुक्यात बुधवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्यासह साहित्याचे नुकसान झाले. पुरामुळे मांजरीला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. आमदार नितीन देशमुख यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लगेच रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
आमदार नितीन बापू देशमुख यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला. मांजरीला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. याची दखल घेत आमदार नितीन देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान, रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लगेचच रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.