लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानासुद्धा शहरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिक ा उपायुक्त समाधान सोळंके यांनी पुन्हा एकदा १६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडण्याची कारवाई केली. यावेळी संबंधितांना दीड लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. सोमवारी रेल्वेच्या मालधक्का परिसरात आरोग्य निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सात क्विंटल कॅरीबॅगचा साठा आढळून आला. हा साठा कमल चावला यांचा असल्यामुळे उपायुक्त समाधान सोळंके यांनी चावला यांना ५0 हजारांचा दंड ठोठावला. यादरम्यान, पूर्व झोन अंतर्गत न्यू क्लॉथ मार्केटस्थित संगम होजिअरी प्रतिष्ठानची तपासणी केली असता, नऊ क्विंटल कॅरीबॅगचा साठा आढळून आला. याप्रकरणात रमेश धिंग्रा यांना एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाशिम बायपास रोडवरील जी.आर. चिल्ड्रेन हॉस्पिटलच्यावतीने मनपाच्या घंटागाडीत बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आला असता हॉस्पिटल प्रशासनावरही २५ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, नंदकिशोर उजवणे यांसह आरोग्य निरीक्षकांनी पार पाडली. -
१६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:49 AM