अकोला : थकीत करापोटी केडिया प्लॉटस्थित मेघदूत अपार्टमेंटमधील वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल लावण्यात आले. ही कारवाई मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने केली.मालमत्ताधारक जमनलाल सोनीतर्फे भाडेकरी अरुण गोलाईत यांच्याकडे सन २००२-०३ ते २०१४ पर्यंतचा १ लक्ष ७ हजार रुपये मालमत्ता कर थकीत होता. यासंदर्भात गोलाईत यांना वारंवार सूचना करण्यात आल्या; परंतु कराचा भरणा न केल्याने अखेर बुधवारी वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल लावण्यात आले.
थकीत करापोटी वीज कंपनीच्या कार्यालयाला सिल मनपाची कारवाई
By admin | Published: July 02, 2014 8:30 PM