अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनातर्फे सुरू आहे. तथापि यासंदर्भात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती संस्थांविरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार लग्नामध्ये ५० वऱ्हाडीच बाेलविण्याची परवानगी आहे. जर यापेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आले तर प्रती वऱ्हाडी २०० रुपये आणि दहा हजाराचा अतिरक्त दंड आकारला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे
कोविड-१९ साथ उद्रेक कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल किंवा इतर तत्सम आवरणांचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र अशा साधनांचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध तसेच विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी संबंधित व्यावसायिक, मालक, आयोजक यांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा आयोजनांतही ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
असा राहील दंड
चेहऱ्यावर मास्क न लावणे
२०० रुपये दंड
( व्यवसायिक, दुकानदार, ग्राहक, व्यक्ती )
दुकानदार, फळभाजीपाला विक्रते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते इ. आस्थापना, मालक, दुकानदार, चहाटपरी, पानटपरी, हॉकर्स, विक्रेता
एक हजार रुपये दंड
(आस्थापना , मालक, दुकानदार, विक्रेता)