अकोला: स्थानीक अशोक वाटिका येथे सोमवार, १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या दिनी ४५ फुटी शौर्य स्तंभ परिसरात उभारण्यात येणार आहे.लॉर्ड बुद्ध फाउंडेशन, वंदना संघ, संघर्ष युथ व समता सैनिक दलाच्या वतीने १ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. अशोक वाटिका येथे या शौर्य दिन महोत्सवाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या उदघाटन सोहळ्यास भदंत बी संघपाल,भन्ते राहुल,भन्ते अश्वघोष, सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब इंगोले , महार बटालियनचे ईरभान तायडे, नीलाक्षी नरवाडे ,नागपूर येथील प्रा.एन.व्ही. ढोके,भीमराव परघरमोल,गुणवंत देवपारे ,महादेव तायडे ,मनोरमा मेश्राम, माजी शिक्षणाधिकारी पी .जे.वानखडे ,डॉ.एम,आर.इंगळे यशवंत तिरपुडे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर ,उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, राहुल बनसोड, महेंद्र डोंगरे, सुगत वाघमारे, देवचंद लबडे, सुभाष महाने, विनोद विरघट, सुरेंद्र तिडके, संयोजक संजय डोंगरे, अशोक इंगोले, बी .गोपनारायण, सतीश वानखडे, वंदना संघच्या सुनीता जाधव , रुक्मिणी इंगोले, गंगा गवई, विद्या सावळे आदीं उपस्थित राहणार आहेत .मान्यवरांच्या हस्ते यावेळी परिसरात उभारण्यात येणाºया भीमा कोरेगाव येथील महार सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाºया ४५ फुटी प्रतीकात्मक शौर्य स्तंभाचे उद्घाटन होणार आहे. तसेच दुपारी १ वाजता व्यायाम शाळेच्या मल्लांचे प्रात्यक्षिक होणार आहे. यात संघर्ष युथ फाउंडेशनचे बिट्टू वाकोडे, सतीश वानखडे, आकाश इंगळे, वस्ताद रतन चोपडे, मुकेश चोपडे ,भीमराव वानखडे, जय तायडे, सुबोध वानखडे आदी सहभागी होणार आहेत. रात्री ७ वा .कवी, गायक गुलाबराज यांच्या संगीतमय चमूचा संगीत सोहळा होणार आहे. या शौर्य दिन महोत्सवात सर्व आंबेडकरी व बहुजनवादी महिला -पुरुष नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन लॉर्ड बुद्ध फाउंडेशन, वंदना संघ, संघर्ष युथ व समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोल्यात सोमवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन; अशोक वाटिकेत उभारणार ४५ फुटी शौर्य स्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 4:36 PM
अकोला: स्थानीक अशोक वाटिका येथे सोमवार, १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या दिनी ४५ फुटी शौर्य स्तंभ परिसरात उभारण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे १ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. अशोक वाटिका येथे या शौर्य दिन महोत्सवाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. लॉर्ड बुद्ध फाउंडेशन, वंदना संघ, संघर्ष युथ व समता सैनिक दलाच्या वतीने आयोजन.