मूर्तिजापूर : संत गाडगेबाबांच्या जन्मोत्सवानिमित्त खापरवाडा व दापुरा येथील संत गाडगेबाबा जन्मोत्सव समितीच्या वतीने सामाजिक बांधीलकी ठेवून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी खापरवाडा तसेच दापुरा येथील जन्मोत्सव समितीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन गाडगेबाबा यांचे पणतू नारायणराव रामचंद्र कोळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण बहूद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश गवई, ज्येष्ठ समाजसेवक नारायण सरोदे, विवेक कांबे, सरपंच शुभांगी सरोदे, दापुरा ग्रामपंचायतचे सरपंच वामनराव डाबेराव, ज्येष्ठ समाजसेवक माणिकराव गवई, भूषण मोरे, योगेश कोळसकर, शरद गवई, नीलेश इंगळे, राहुल दामोदर, संतोष कोळसकर, संदीप गवई, वैभव गवई, रूपेश इंगळे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
गजानन कावरे, रणजित खंडारे, गोकूळ दामोदर, संतोष कोळसकर, शंकर टोळे, पंकज धारपावर, मंगेश कावरे, गोकूळ सरोदे, रितेश गवई, प्रशिक वानखडे, प्रवीण गावंडे, अनिल सावळे यांनी परिश्रम घेतले.