क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करावी, असे आवाहन महात्मा फुले समता परिषद राज्य सरचिटणीस प्रा. तुकाराम बिडकर यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक, सामाजिक, काव्यलेखन आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. जयंती दिनी त्यांचे स्मरण करताना जयंती ‘उत्सव’ म्हणून साजरा करावा. या दिवशी महिलांनी आडवी चिरी (सावित्रीबाई लावत तसे आडवे कुंकू) कपाळावर लावावे, घरावर गुढ्या उभाराव्यात, घराला तोरण बांधावे, सावित्रीबाईच्या काव्यरचना वाचाव्यात, महात्मा फुले यांच्या साहित्याचे वाचन करावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे, घरासमोर रांगोळी काढावी, महात्मा फुले - सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणात आणण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले जयंती ‘उत्सव’ म्हणून साजरी करा - बिडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:16 AM