वाडेगाव : स्व. गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांच्या स्मृती दिनी स्नेहसंमेलन काेराेना प्रतिबंधासाठी ५ जानेवारी राेजी साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्व. बापूसाहेब मानकर यांच्या ५१व्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. हिम्मतराव घाटोळ होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक आमले गुरुजी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष मानकर, उपाध्यक्ष डॉ. वासुदेवराव फाळके, सदस्य विश्वनाथ मानकर, सदस्य मो. अबुबकर, बहिणाबाई खोटरे विद्यालय, बाळापूरचे अध्यक्ष रमेश ठाकरे, स्व. भाऊसाहेब तिरुख विद्यालय, खिरपुरीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र तिरुख, शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. एम. मानकर, रामदास साबळे, मारोती भगत, लुलोरे, सेवानिवृत्त शाळेतील शिपाई सत्कारमूर्ती रमेश फाळके, त्यांच्या पत्नी रुख्मिणीबाई फाळके, मुख्याध्यापक सुनील मसने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
रमेश फाळके यांचा सपत्नीक सत्कार संतोष मानकर यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक सुनील मसने यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त शिक्षक आमले गुरुजी यांनी बापूसाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. डॉ.राजेंद्र तिरुख, रमेश ठाकरे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चक्रधर खेरडे यांनी केले. आभार वसंत वक्टे यांनी मानले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे, पर्यवेक्षक कैलास ताडे, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.