शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अकोल्यात संत जलाराम जयंतीचे आयोजन, शहरातून निघणार  शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:26 PM

अकोला:  हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत जलाराम बाप्पा यांच्या २१८ व्या जयंतीचे आयोजन शुक्रवार २७ आॅक्टोबर करण्यात आले आहे. या पर्वावर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानीय बिर्ला कॉलनी परिसरातील जलाराम बाप्पा मंदिरात शुक्रवार दि .२७ आॅक्टो रोजी हा जन्म जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिनी   ...

ठळक मुद्देशहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

अकोला:  हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत जलाराम बाप्पा यांच्या २१८ व्या जयंतीचे आयोजन शुक्रवार २७ आॅक्टोबर करण्यात आले आहे. या पर्वावर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानीय बिर्ला कॉलनी परिसरातील जलाराम बाप्पा मंदिरात शुक्रवार दि .२७ आॅक्टो रोजी हा जन्म जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिनी   सकाळी ७ वा.जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे समाजसेवी रसिक कारिया, नरेंद्र गणात्रा, संजय ठाकणार यांच्या हस्ते बाप्पा यांची प्रतिमा पूजन, अभिषेक व ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. मंदिर परिसरात छपन्न भोग दर्शन कार्यक्रम होणार असून, दु.१२  वा. ब्रिजमोहन चितलांगे, समाजसेवी भाईलाल पोपट, भाईलाल जीवाणी, सुधाबेन उनडकाट यांच्या हस्ते महाप्रसादास प्रारंभ होणार असल्याची माहिती मंदिर प्रमुख नंदकिशोर द्रोण यांनी या संदर्भात मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत दिली. जयंती दिनी दुपारी लोहाणा महिला मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात भव्य रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ९ वा. कार्यक्रमाचे मुख्य यजमान मुंबई येथील प्रवीण ठक्कर, राहुल शाह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्या निघणार शोभायात्राजयंती पर्वाच्या पूर्व संध्येवर गुरुवार, २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. स्थानीय रतनलाल प्लॉट परिसरातील रघुवंशी मंगल कार्यालय येथून संत जलाराम यांची भव्य शोभायात्रा निघणार आहे. समाजसेवी जयंतीलाल सायानी, नितेश बरालिया, किशोरकुमार रुपारेल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही शोभायात्रा जलाराम बाप्पा यांच्या मनोहारी देखाव्यासोबत दुर्गा चौक परिसरातून जलाराम मंदिर येथे पोहचणार आहे. या जयंती सोहळ्यात समस्त महिला-पुरुष व बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोहाणा महाजन सभा, जलाराम भजन मंडळ, लोहाणा महिला मंडळ , युवक मंडळ, हरी सेवा समिती व जलाराम मंदिर कार्यकर्त्यांंच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक