शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन

By आशीष गावंडे | Published: June 20, 2024 10:39 PM

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते.

अकाेला: लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे. २८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली. परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. या दाेन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले. 

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा.सावंत यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढणार आहाेत. पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन हाेणार असल्याने तुम्ही जाेमाने कामाला लागा,असे आवाहन खा.सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, प्रा.नरेंद्र खेडेकर,माजी आ.संजय गावंडे, हरिदास भदे, अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती. हाेय, मुस्लिमांनी मते दिली!जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला काैल दिल्याचे सांगत खा.अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले. हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.संघटनात्मक बांधणीवर भरभाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे. यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार आ.देशमुख यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना