विवेक चांदूरकर/अकोला फिडरनिहाय भारनियमनाचा फॉर्म्युला आणि तत्सम विविध योजनांमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनल्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील तब्बल दहा राज्यांनी महावितरणच्या विविध योजनांचा अभ्यास केला असून, केंद्रीय उर्जा राज्य मंत्र्यांनीही इतर राज्यांना महावितरणचे अनुकरण करण्याच्या सूचना दिल्यामुळे, महावितरण देशपातळीवर स्टडी हब बनले आहे. मागणीएवढा विद्युत पुरवठा उपलब्ध असल्यावरही ज्या भागात विजेची चोरी व गळती होते, त्या भागात भारनियमन करण्याचा नवा प्रयोग महावितरण राबवित आहे. परिणामी नियमित वीज देयके अदा करणार्यांना अखंडित विद्युत पुरवठा होत आहे, तर देयके अदा न करणार्यांना भारनियमन सहन करावे लागत आहे. त्यामुळे वीज गळती कमी होत असल्याचे आशादायी चित्र आहे. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण ही देशातील पहिली कंपनी आहे. याशिवाय महावितरणने रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रा रेड मीटर लावणे सुरू केले आहे. त्यामुळे कंपनी नफ्यात आली आहे. तब्बल दोन कोटी ग्राहकांना विद्युत पुरवठा करून, त्याची नियमित वसुली होत असल्यामुळे, सर्व देशाचे लक्ष महावितरणकडे वेधल्या गेले आहे.*स्वत: विकसित केली आज्ञावली महावितरण २0१0 पासून ऑनलाईन जोडणी देणे, मीटर वाचन, देयक अदायगी ही सर्व कामे संगणीकृत यंत्रणेच्या मार्फत राबवित आहे. महावितरणने फोटो मीटर रिंडीग, कॉल सेंटर आदी बाबी सुरू केल्या आहेत. व्यवस्थापकीय माहिती प्रणाली (एमआयएस)मध्ये पूर्णपणे ताळमेळ घालण्यात आला आहे.
महावितरणचे अनुकरण करण्याची केंद्रीय उर्जा राज्य मंत्र्यांची सूचना
By admin | Published: November 08, 2014 11:31 PM