शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 6:02 PM

Corona situation of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.

जिल्ह्यातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीचा व त्यावर जिल्हा प्रशासनामार्फत होत असलेल्या उपाययोजनांचा आज केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आज केंद्रीय पथक दाखल झाले. डॉ.  मनिष चतुर्वेदी व डॉ. महेशबाबू या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या या पथकाने जिल्ह्यातील कोविड सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त व्ही.डी. सुलोचने, निरीक्षक संजय राठोड,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. श्याम शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  जिल्ह्यातील कोविड सद्यस्थिती व त्याबाबत  जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेले उपाययोजना याबाबत सादरीकरण केले. यावेळी पथकातील दोन्ही  तज्ज्ञांनी  कोविड चाचण्या, त्यानंतर पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार, उपचार करतांना पालन केलेल्या बाबी याबाबत माहिती जाणून घेतली. आताच्या कोविड उद्रेकात कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यू दराबाबत पथकातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. याबाबतही त्यांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सकडून अधिक माहिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील लोकांना होणारा संसर्ग ते रुग्ण संसर्गाच्या विविध पातळीवर पोहोचण्याचा कालावधी, या कालावधीत  त्याचेवर झालेल्या उपचाराची माहिती, तसेच रुग्णाच्या सहव्याधींबाबतची स्थिती या विषयांवर त्यांनी चर्चा केली. संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे, असे निरीक्षण मांडण्यात आले. त्यामुळे रुग्णांनी चाचणी करुन तात्काळ रुग्णालयात दाखल होणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यानुसार उपचार घेणे याबाबत शासकीय, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा व प्रत्यक्ष लोकांमध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे  जनजागृती करण्याची आवश्यकता आहे,असे मत त्यांनी मांडले. तसेच जिल्ह्यात आवश्यक उपचार सुविधा, औषधे व चाचण्यांची सुविधा तसेच ऑक्सिजन उपलब्धता याबाबत माहिती जाणून घेतली.   तसेच लसीकरणाच्या मोहिमेबाबतही माहिती घेतली.

जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या दोन दिवस हे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करुन माहिती घेणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या